चांदीच्या गदेचा मानकरी ठरला पाथर्डीचा पहिलवान कार्तिक गवळी
मंगेश ताकाटे,
नाशिक (प्रतिनिधी): कामटवाडे गावात हनुमान यात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर या यात्रोत्सवानिमित्त सालबादप्रमाणे आयोजित करण्यात येणारी कुस्त्यांची भव्य दंगल यंदाही रंगली. या कुस्तीच्या स्पर्धांमध्ये पाथर्डी गावातील पहिलवान कार्तिक गवळी चांदीच्या गदेचा मानकरी ठरला असून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
![हनुमान यात्रोत्सव: कामटवाडे गावात रंगली कुस्त्यांची दंगल! 2 IMG 20240430 WA0004](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240430-WA0004.jpg?resize=640%2C296&ssl=1)
कामटवाडे येथील यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे चांदीची गदा बक्षीस असणारी पहिलवानांची कुस्ती असते. यावर्षी ही कुस्ती पाथर्डीचा कार्तिक गवळी व सिन्नरचा सार्थक मोरे यांच्यात रंगली. अतिशय चुरशीच्या लढतीत कार्तिक गवळी याने ही कुस्ती जिंकून चांदीची गदा पटकावली. त्याला कै. चिंधुभाऊ राजाराम मटाले यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा व रोख पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.
![हनुमान यात्रोत्सव: कामटवाडे गावात रंगली कुस्त्यांची दंगल! 3 IMG 20240430 WA0002](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240430-WA0002.jpg?resize=640%2C296&ssl=1)
विजेत्या पहिलवानास महापौर केसरी विजेते आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते चांदीची गदा व रोख पारितोषिक देण्यात आले. पंच म्हणून प्रताप मटाले, नंदू गायकर, तुकाराम मटाले, छगन बंदावणे, संजय मटाले यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले ,अविनाश फडोळ यांनी केले .पाहिलवानांचे व उपस्थितांचे स्वागत माजी नगरसेवक अनिल मटाले यांनी केले.
![हनुमान यात्रोत्सव: कामटवाडे गावात रंगली कुस्त्यांची दंगल! 4 IMG 20240430 WA0008](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240430-WA0008.jpg?resize=640%2C296&ssl=1)
यात्रोत्सवाच्या यशस्वितेसाठी भास्करराव जाधव, हरीभाऊ मटाले, देविदास मटाले, यादवराव मटाले, योगेश मटाले, सुभाष गायकर, अॅड. अतुल सानप, गोरक्ष मटाले, निवृत्ती मटाले, बाळासाहेब वाघ, ओम मटाले, भाऊसाहेब पवार, योगेश शेजवळ, नरसिंग तोंडारे, विजय मटाले, भारत मटाले, ओमकार मटाले, आदित्य मटाले, विलास मटाले, बाळासाहेब कसबे, दत्तात्रय टाव्हरे, यशवंत जाधव, सचिन खेडकर, बाळा धाकराव, कमलाकर दिवे यांनी परिश्रम घेतले.