नाशिक (प्रतिनिधी) : लोकसभा मतदारसंघात एकूण ३१ उमेदवार रिंगणात असल्यामुळे दोन ‘ईव्हीएम’ लावण्यात येणार आहेत. एका मशीनवर १६ उमेदवारांची नावे असतात. मतदार संघातील उमेदवारांची संख्या ३१ असल्याने दोन ईव्हीएम लावावे लागणार आहेत. शहरातील चार व ग्रामीण भागातील सिन्नर, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हे दोन विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभेत समाविष्ट होतात. लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ३० हजार १२४ मतदार आहेत. आज एकूण १९१० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.