–II ● विवेक विचार ● II–
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५२३ वा दिवस
हिंदुस्थानातील सर्वसामान्य जनतेचा उद्धार करणे हेच आपले आद्य कर्तव्य होय. असे मानणाऱ्या व त्यासाठी आपले सर्वस्व तन-मन-धन व प्राण अर्पण करण्यास सदैव तयार असलेल्या तरुण लोकात काम करायला सुरुवात करा. त्यांच्यात जागृती निर्माण करा. त्यांना संघटित करा आणि त्यांच्या ठायी त्यागाची प्रेरणा उत्पन्न करा. हे सारे कार्य भारतीय तरुणांवरच पूर्णपणे अवलंबून आहे. सशक्त, उत्साही, श्रद्धावान, निष्ठावान, निःस्वार्थ व निष्कपट अशा तरुणांची आपल्याला आवश्यकता आहे. असे तरुण एकत्र आल्यास नक्कीच जगात क्रांती घडविता येईल.
…स्वामी विवेकानंद
● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●
★ भारतीय सौर ६ वैशाख शके १९४६
★ चैत्र वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५०
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४
★ श्रीधर स्वामी पुण्यतिथी, सज्जनगड
★ १९२० प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा स्मृतिदिन.
★ १९५६ भारतातील पहिल्या वृत्तपत्र कागदाच्या कारखान्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्घाटन केले.
★ जागतिक बौध्दिक संपदा दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक