आज महाराष्ट्रताज्या बातम्यानाशिक शहर

निवडणूकांच्या तोंडावर जातीपातीचे अभद्र राज- कारण : राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा आरोप

Views: 1108
0 0
Read Time:3 Minute, 31 Second

Loading

नाशिक:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करतात अशी विचारहीन टीका राज ठाकरे यांनी केली याला प्रत्युत्तर देतांना निवडणूकांच्या तोंडावर जातीपातीचे हेच का ते अभद्र राज-का-रण असा टोला राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी लगावला आहे.

दोन वर्षांपासून संपूर्ण देशाला कोरोना सारख्या रोगाने कवेत घेतले होते. आता कुठेतरी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून महाराष्ट्रात गुढीपाडवा सण सर्वसामान्य जनता आनंदात साजरा करत असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिठाचा खडा टाकलाच.

निवडणूका आल्या की विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी पोटशूळ उठतोच. झाले असे कि मनसेच्या मुंबई शिवतिर्थावर झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्रात शरद पवार जातीपातीचे राजकारण करतात अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे असो किंवा विरोधी पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे भाषणच पूर्ण होत नाही. किमान राज ठाकरेंनी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनेपासूनचा अभ्यास केला पाहिजे होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. म्हणूनच पक्षात अनेक जातींचे नेते स्वकर्तृत्वाने प्रमुख पदांवर विराजमान आहेत.

साहेब मराठा समाजाचे असले तरी पक्षातील अनेक कर्तृत्ववान मराठा समाजाच्या पदाधिकारींना इतर समाजाला संधी देतांना दोन पाऊले माघारी रहावे लागते हे पक्षाचे धोरण आहे. यास्तव मराठा समाज देखील कधी कधी नाराज होतो तरी साहेब पक्षाच्या विचांरापासून तसूभरही मागे हटत नाही. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. राज साहेब आता सर्व सामान्य जनता केवळ विकासाला मानते. आम्हीही हिंदू आहोत म्हणून इतर धर्माचा नाहक विरोध करत नाही. आपण धर्माभिमानी आहात म्हणून कृपा करून आमच्या स्वाभिमानी नेतृत्वावर टीका नको नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना हातातल्या बांगड्या काढायला वेळ लागणार नाही.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
100 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *