श्रीनगर : केंद्र सरकारने सोमवारी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यानंतर पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक केल्याचं समजतंय.
मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना त्यांच्या घरुन शासकीय विश्रामगृहात नेण्यात आलं आहे. मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना रविवारी रात्री उशीरा नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.