मुंबई : इन्स्टाग्रामवर आपण शेअर केलेल्या फोटोवर आपल्याला फक्त लाईक कमेंट मिळतात. पण काही लोकांना अशा पोस्टवर लाईक शेअर तर मिळतातच त्याबरोबरच त्यांना लाखो, करोडो रुपयेही मिळतात. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने जर इन्स्टाग्रामवर एखादी पोस्ट केली तर तब्बल 1 कोटी 35 लाख रुपये मिळतात. इन्स्टाग्राम प्रत्येक सेलेब्रेटीला आपल्या प्रत्येक पोस्टसाठी विशिष्ट रक्कम देत असते.
क्रीडा प्रकारात इंस्ट्राग्रामवर सर्वाधिक कमाई करण्याच्या टॉप 10 व्यक्तींमध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे, अशी माहिती हॉपर एचक्यू या वेबसाईटने दिली आहे. सध्या इंस्टाग्रामवर विराटचे 3 कोटी 8 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. त्याने टाकलेल्या एका पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. त्याला एका इन्स्टाग्राम पोस्टमधून 1,96,000 डॉलर म्हणजेच सुमारे 1 कोटी 35 लाख रुपये मिळतात. अर्थात हा पैसा त्याला मिळणाऱ्या एका क्रिकेट सामन्याच्या मानधनाच्या 22 पट अधिक आहे.
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पैसे मिळवणारे १० खेळाडू-
1.क्रिस्टियानो रोनाल्डो – फुटबॉल – 784000 पाउंड (6 कोटी 73 लाख)
2. नेमार – फुटबॉल – 580000 पाउंड (4 कोटी 98 लाख)
3. लियोनेल मेसी – फुटबॉल – 521000 पाउंड – (4 कोटी 47 लाख)
4. डेविड बैकहम – फुटबॉल – 287000 पाउंड (2 कोटी 46 लाख)
5. लेब्रोन जेम्स – बास्केटबॉल – 219000 पाउंड (1 कोटी 88 लाख)
6. रोनाल्डिनो – फुटबॉल – 206000 पाउंड (1 कोटी 76 लाख)
7. गैरेथ बेल – फुटबॉल – 175000 पाउंड (1 कोटी 50 लाख)
8. इब्राहिमोविच – फुटबॉल – 161000 पाउंड (1 कोटी 38 लाख)
9. विराट कोहली – क्रिकेट – 196000 पाउंड (1 कोटी 35 लाख)
10. लुईस सुआरेज – फुटबॉल – 148000 पाउंड (1 कोटी 27 लाख)