शिमला: हिमाचल प्रदेशात लोकसभा मतदानादरम्यान एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मतदानाच्या दिवशी चाचणीसाठी घेतलेली मतं निवडणूक अधिकारी डिलीट करायचे विसरुन गेले.
धक्कादायक म्हणजे जेव्हा हा प्रकार लक्षात आला तेव्हा खरी मतं डिलीट केली असल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार रविवारी घडला.
हिमाचल प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त देवेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक आयोग 20 निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी 15 अधिकाऱ्यांचं निलंबन होण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेेशमध्ये शिमला, मंडी, हमीरपूर आणि कांग्रा या ठिकाणी मतदान पार पडलं. त्यादरम्यान हा प्रकार घडला.