ताज्या बातम्या

समलैंगिक असल्याने द्युती चंदला तिच्या बहिणीने घरातून बाहेर काढण्याची दिली धमकी

Views: 189
0 0
Read Time:1 Minute, 19 Second

Loading

नवी दिल्ली : धावपटू द्युती चंदच्या समलैंगिक संबंधावर तिची मोठी बहिण नाराज आहे. एवढच नाही तर तिला घरातून बाहेर काढण्याची आणि तुरूंगात पाठवण्याची धमकी बहिणीने दिल्याचं द्युतीने सांगितले आहे.

द्युती चंदने आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला दोन रौप्य मिळवून दिले आहेत. एका मुलाखतीत तिने तिच्या खासगी जीवनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. आपले काही वर्षांपासून समलैंगिक संबंध असल्याचं तिने सांगितलं आहे.

गावातच असलेल्या मैत्रीणीसोबत माझे संबंध आहेत. पण तिची ओळख मी सांगणार नाही. विनाकारण ती लोकांच्या नजरेत येणं मला पसंत नाही, असं द्युतीने सांगितलं आहे.

द्युती चंदने आशिया क्रीडा स्पर्धेत 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. आगामी वर्ल्ड अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि टोकियो ऑलम्पिक 2020 साठी तिचा सराव सुरू आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *