कराची : पाकिस्तानमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार
ग्वादार बंदर येथील पर्ल कॉन्टिनेन्टल या हॉटेलमध्ये हा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये ग्रेनेड बॉम्ब फेकत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी हॉटेलच्या आसपासच्या संपूर्ण भागाला वेढा घातल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.
सर्व विदेशी नागरिक आणि इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे, अशी माहिती बलुचिस्तानचे माहिती आणि प्रसार मंत्री जहूर बुलेदी यांनी दिली. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.