मनमाड (प्रतिनीधी) : कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून वाहतूक करणाºया ट्रकसह २५ जनावरे मनमाड पोलिसांनी तब्यात घेतले असून या कारवाईने शहर परीसरात अवैद्यरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक व कत्तल करणा-यांचे धाबे दणाणले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंश जनावरांची तस्करी रोखण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशानुसार मनमाड शहर पोलीस स्थानक हद्दीत नाकाबंदी तसेच व पेट्रोलींग सुरू असताना रविवारी पाहटेच्या सुमारास येवल्याकडून गोवंश जनावराची तस्करी करणारा ट्रक येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या ट्रकचा पोलीस शोध घेत असताना अनकवाडे शिवारात पोलिसांना येवल्याकडुन मनमाडच्या दिशेने ट्रक क्र. एमएच ०४ जीएफ ७२७८ येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला. परंतु वाहन चालकाने ट्रक थांबवला नाही. त्यामुळे पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करुन राधेकृष्ण हॉटेल जवळ येवला रोडवर ट्रक थांबवून तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये गोवंश जातीची २५ जनावरे निर्दयतेने कोबून दोरखंडाने वाहनाच्या अँगलला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच ट्रकमध्ये एक तलवारही मिळून आली आहे. त्यामुळे ट्रकचावर संशयित युसुफ अन्वर रियाज अहमद, खालीद अख्तर शाहीद अख्तर व आबिद हुसैन मोहम्मद हारुण (सर्व रा. मालेगाव) यांच्याविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लांडगे करीत आहेत. मनमाड पोलीस निरीक्षक अशोक घुगे, कर्मचारी सुर्यभान भालके, समाधान देशमुख, महेंद्र पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.