नाशिक (प्रतिनिधी) : मतमोजणीच्या अनुषंगाने परिसरातील स्ट्राँगरूम भागात मतमोजणीच्या दिवशी पहाटे ४ ते रात्री १० वाजेदरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मतमोजणीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला असून, या मार्गावर शासकीय वाहने वगळता अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
प्रवेश बंद मार्ग…
अंबड एमआयडीसीतील जेमिनी इंस्ट्राटेक लि. कंपनी ते अंबड वेअरहाउस, तसेच अंबड पॉवर हाउसकडे जाणा-या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्लॅक्सो कंपनी मेन गेट अंबड लिंकरोड ते संजीवनी बोटॅनिकल नर्सरीकडे जाणा-या मार्गावरील अवजड वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे. अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे येणा-या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतुकीस पर्यायी मार्ग
जेमिनी इन्स्ट्राटेक कंपनी ते उज्ज्वल ह्युंडाई नाशिक ते गरवारे या मार्गाने वाहतूक सुरू राहील, गरवारे ते पॉवर हाउसमार्गे एक्स्लो पॉइंट या मार्गाने वाहतूक सुरू राहील. तसेच, अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे येणाºया मार्गावरील वाहने अजिंठा हॉटेलमार्गे एक्स्लो पॉइंटकडून जातील.