- सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५६० वा दिवस
धैर्याने, शौर्याने, सतत पुढे पुढे चला. एका दिवसात एका वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा मुळीच बाळगू नका. आपल्याला पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांची देखील आवश्यकता आहे. आत्म्याच्या बाबतीत कोणताच लिंगभेद नसतो. भारताच्या हिमालय पर्वतापासून ते कन्याकुमारी पर्यंत. उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र वणव्याप्रमाणे पसरणारे सहस्त्र नरनारी आपल्याला हवे आहेत. नुसता पोरखेळ करीत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यासाठी आपल्याला सवडी नाही. केवळ पोरखेळ करण्यासाठी जमलेल्यांनी सरळ चालते व्हावे. अद्यापि वेळ गेली नाही. त्यांचे इथे काहीही काम नाही.
*…स्वामी विवेकानंद*
*● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●
*★ भारतीय सौर १२ जेष्ठ शके १९४६*
★ वैशाख वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५०
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ रविवार दि. २ जून २०२४
★ १९४८ शेतकरी कामगार पक्षाची स्थापना.
★ १९५५ इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्मदिन.
★ १९८८ सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक राज कपूर यांचा स्मृतीदिन.
★ २००४ महाराष्ट्राचे अवलिया व्यक्तीमत्व श्रीकांत जिचकार यांचा स्मृतीदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*