भारतीय हवाई दलातील सेवानिवृत्त सैनिक चंद्रकांत शिंदे यांचे निधन!
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर कॉलनी येथील रहिवासी चंद्रकांत किसनराव शिंदे, (वय 80) मुळगाव धोंडगव्हाणवाडी चांदवड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय हवाई दलातील भूतपूर्व सैनिक व एचएएल मधील निवृत्त कर्मचारी होते.
1965 व1972 भारत पाकिस्तान युद्धात सहभाग घेतल्याबद्दल विशेष सेवा पदक देण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सातपूर कॉलनी, नाशिक व मुळगाव धोंडगव्हाण वाडी चांदवड येथे आदरणीय भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. देशसेवा ही परिवारात रुजवत मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, व नाशिक पोलीस दलातील कर्मचारी संजय शिंदे यांचे ते वडील होत.