आपल्या पाल्याची एकाग्रता वाढवण्यासाठी माेफत प्रशिक्षण शिबिरास भेट द्या!
सातपूर (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना माेबाईलपासून दूर ठेवतानाच त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी व कृतीशील शिक्षणावर भर देण्यासाठी ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन आणि ब्रेन ट्रेन पझल्स क्लब महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रूबिक क्यूब कसा साेडवावा हे शिकवण्यासाठी २९ मे ते २ जून या पाच दिवसांसाठी माेफत प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. कालिका माता देवस्थान हाॅलमध्ये संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत हे शिबिर हाेणार आहे.
मुलांच्या स्मरणशक्तीचा विकास व्हावा, अभ्यासाप्रती मुलांची एकाग्रता व्हावी, मोबाईल पासून विद्यार्थी दूर व्हावेत, हँड्स ऑन एक्सपिरीयन्स तसेच कृतीयुक्त शिक्षणावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे या उद्देशाने मोफत शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. या शिबिरात सुरुवातीला विद्यार्थी, पालक व शिक्षक असे सर्वांसाठी थ्री बाय थ्री रुबीक क्यूब चे सर्व नियम सूत्र व स्पीडने सोडवण्याचे तंत्र, तसेच विविध आकडेमोड जलद करण्यासाठीच्या युक्त्या असा संयुक्तिक उपक्रम हाेणार आहे. हे शिबिर सर्वांसाठी विनामुल्य असून ब्रेन ट्रेन परिवारातील सर्व शिक्षक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वैयक्तिक मार्गदर्शन करतील. शेवटच्या दिवशी क्यूब सोडवण्याचे तंत्र कोणी अवगत केले हे चेक करण्यासाठी एक स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती आयाेजक नरेंद्र निकुंभ व रूपाली फुले यांनी दिली. विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी ९८२३६७९४२८, ७७५७०१७२५७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ऋतुजा घोणे व सार्थक शुक्ल यांनी केले आहे.