सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५४४ वा दिवस
जे दुसऱ्यांना दोष देत असतात, अशांची संख्या दिवसेंदिवस सारखी वाढते आहे. ते बहुधा दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक असतात. स्वतःच्या चुकांनी त्यांनी ती दुर्दशा स्वतःवर ओढवून घेतलेली असते. मग ते विनाकारण इतरांना दोष देत बसतात, परंतु त्याने त्यांच्या अवस्थेत काहीच फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचा कसलाही फायदा होत नाही. उलट, दुसऱ्यांवर दोष लादण्याच्या ह्या प्रयत्नांनी ते आणखीनच दुबळे मात्र बनतात. म्हणून स्वतःच्या दोषांसाठी दुसऱ्या कुणालाही दोष लावू नका. स्वतःच्या पायांवर उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःवर घ्या.
*…स्वामी विवेकानंद*
*● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●*
*★ भारतीय सौर २७ वैशाख शके १९४६*
★ वैशाख शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५०
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शुक्रवार दि. १७ मे २०२४
★ सीता नवमी, जानकी जन्म
★ १८६५ सुलतानशाही पासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्मदिन.
★ जागतिक दूरसंचार दिन
★ जागतिक उच्च रक्तदाब दिन
★ जागतिक माहिती संस्था दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*