नाशिक (प्रतिनिधी): सहा वर्षानंतर एसटी कर्मचा-यांना मंडळातर्फे गणवेशाचे कापड मिळणार आहे. गेल्यावेळी मिळालेले कापड व डिझाईन कर्मचा-यांना पसंत नव्हते. त्यामुळे अनेकांनी स्वत:च्या खर्चाने गणवेश शिवले. त्याची शिलाई अद्याप मिळालेली नाही. आता नवीन गणवेशाचे कापड देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र नवीन गणवेशाचे कापड चांगल्या दर्जाचे असावे, आणि वर्षाला दोन गणवेश द्यावेत. तसेच सदर निर्णयाची लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी एसटी कामगारांनी केली आहे.
एसटी महामंडळातील चालक व वाहकांना गेल्या ६ वर्षांपासून गणवेश पुरवण्यात आला नाही. २०१९ मध्ये कर्मचा-यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले, मात्र ते अमान्य असल्याने पुन्हा पाठवण्यात आले. त्यानंतर गतवर्षी पुन्हा यासाठी निविदा प्रक्रिया राबवत अखेर बºयाच प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाºयांना गणवेश वाटप करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कर्मचा-यांमध्ये याबाबत कोणतीही उत्सुकता दिसून येत नाही. कारण गेल्या ६ वर्षांत कर्मचा-यांनी स्वखर्चाने गणवेश शिवल्याने त्या कालावधीतील खर्च एसटी महामंडळ देणार का? गणवेश कापड मिळाले तरी ते किती जोड्या मिळणार, असे प्रश्न कर्मचा-यांकडून उपस्थित केले जात आहेत.
कर्मचा-यांना २०१६ पर्यंत प्रशासनातर्फे कापड व शिलाई भत्ता दिला जायचा. यामध्ये कर्मचाºयांना दोन गणवेश व्हायचे. २०१७ पासून ही पद्धत बदलण्यात आली. चालक, वाहक, अधिकारी यांच्या गणवेशाच्या रंगात फरक करण्यात आला, तसेच कर्मचा-यांना शिवलेला तयार गणवेश देण्यात येऊ लागला, असे दोन गणवेश वर्षातून मिळायचे. तत्कालीन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २०१७ मध्ये एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक यांचा गणवेश बदलण्याची योजना आखली होती.