नाशिक (प्रतिनिधी): प्रियकराने आपल्या प्रेयसीची बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या नातलगांना पाठविल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम पाटोळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पेठ रोड भागात राहणाºया युवतीने तक्रार दाखल केली आहे. पीडितेचे गेल्या वर्षभरापासून संशयिताशी प्रेमप्रकरण सुरू आहे. याकाळात तरुणाने वेळोवेळी शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, मुलीने त्यास नकार दिल्याने ही घटना घडली. या प्रेमप्रकरणात संशयिताने मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले होते. विनवण्या करूनही युवती शरीर संबंध ठेवण्यास नकार देत असल्याने संशयिताने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.१०) रात्री मुलीच्या नातेवाईकांच्या मोबाइलवर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पीडितेने तत्काळ पोलिसांत धाव घेतली. अधिक तपास निरीक्षक ज्योती आमणे करीत आहेत.