सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५३९ वा दिवस
सेषा प्रसन्न वरदा नृणां भवति मुक्तये
ती जगन्माता प्रसन्न झाल्यास माणसाला वर (आशिर्वाद) देऊन मुक्त करते. या महामायेला पूजावंदनादीद्वारा जोवर प्रसन्न करून घेत नाहीत, तोवर काय मजाल आहे ब्रम्हा-विष्णू-महेशादिकांची देखील की, ते तिच्या हातून सुटून मुक्त होऊ शकतील? भारतात आदर्श स्त्रिजीवन म्हणताच एकमात्र मातृभावाचीच कल्पना आम्हा भारतीयांच्या मनात येते. भूतलावरील परमेश्वराचे साक्षात स्फुर्लिंग म्हणून आपण मातेची आळवणी करतो. बालपणी मुलामुलींनी नित्यनेमाने आपल्या मातेच्या चरणी मस्तक ठेवून, त्या चरणांचे तीर्थ घ्यावे, अशी आमची संस्कृती आहे.
…स्वामी विवेकानंद
*● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●*
*★ भारतीय सौर २१ वैशाख शके १९४६*
★ वैशाख शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५०
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ रविवार दि. १२ मे २०२४
★ आद्य शंकराचार्य जयंती
★ १६६६ आग्रा येथे दरबारात छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेबाची पहिली व अखेरची भेट झाली.
★ १९५२ भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या संसदीय अधिवेशनास प्रारंभ.
★ २०१२ नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय रोडूआण्णा पाटील यांचा १२ वा स्मृतीदिन.
★ जागतिक परिचारिका दिन.
★ जागतिक मातृत्व दिन
★ मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृत्व दिन असतो
★ मातृत्व दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*