रविवार, १२ मे २०२४. वैशाख शुक्ल पंचमी. ग्रीष्म ऋतू. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे” *श्री. आद्य शंकराचार्य जयंती*
चंद्रनक्षत्र – आर्द्रा/पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक मोठे लाभ करून देणारा दिवस आहे. संधीचे सोने करा. दीर्घकालीन नफा होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूसाठी खर्च कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अचानक लाभ होतील. मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल. प्रवास घडतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. मनोरंजन आणि करमणूक यात व्यस्त राहाल. एखादी अप्रिय बातमी कानावर येऊ शकते.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ग्रहमान आहे. सुटीचा आनंद उपभोगाल. प्रगती होईल. कोणत्याही विरोधाभासात पडू नका.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. मनासारख्या घटना घडतील. धनलाभ होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. राजकारण टाळणे उत्तम आहे. विनाकारण गैरसमज होऊ शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शनी चंद्र शुभ योगात असले तरी त्याचा फारसा अनुकूल परिणाम दिसून येणार नाही. वादविवाद टाळा. शत्रू शिरजोर होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मनाप्रमाणे दिवस व्यतीत होईल. सौख्य लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जसे आर्थिक आवक होणार आहे तसेच खर्च देखील वाढणार आहे. राहत्या घरांसाठी खरेदी होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आध्यत्मिक लाभ मिळण्यासाठी उत्तम दिवस आहे. सिद्धी प्राप्त होतील. लेखनातून यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दानधर्म करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आज जितके पुण्य कर्म कराल तितकी त्याची शुभ फळे भविष्यात मिळतील.