रविवार, ५ मे २०२४. चैत्र कृष्ण द्वादशी/ त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस आहे” *प्रदोष*
चंद्रनक्षत्र – उत्तरा भद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रतिकूल दिवस आहे. विनाकारण वादविवाद टाळा. वाहन जपून चालवा. शक्यतो अराम करा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. चंद्र अनुकूल आहे. वादविवाद टाळा. अनितीचा मार्ग नको.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी कटकटी संभवतात. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. व्यवसायात तीव्र स्पर्धा जाणवेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारशी अनुकूलता नाही. प्रवासात त्रास सांभावतो. चोरीचे भय आहे. खिसा पाकीट सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे. यंत्र हाताळताना काळजी घ्या. अपघाताचे भय आहे. मोठी जोखीम नको.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रू त्रास जाणवेल. मोठी स्पर्धा होईल. व्यावसायिक बाबतीत जपून निर्णय घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भलते धाडस नको. आर्थिक लाभ होतील मात्र खर्च देखल वाढेल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. उधार देणे टाळा. आर्थिक जोखीम नको.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरगुती प्रसंगात संयम ठेवा. वाद विवाद टाळून माघार घ्या. सामाजिक कामातून त्रास होईल. बाग बगिच्यात सावध रहा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लेखणी हे मोठे शस्त्र आहे. त्याचा दुरुपयोग टाळा. लहान भाऊ, नोकर यांच्याशी वाद होऊ शकतात.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कमी बोलणे हीताचे आहे. आर्थिक चिंता वाढतील. उधारी टाळा. मोठी खरेदी आज नको. मित्रमंडळी भेटतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत चंद्र मंगळ युती आहे. आत्मविश्वास वाढेल. कठोर बोलणे होईल. गूढ उलगडतील. खाण्यातून त्रास होऊ शकतो.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)