सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५३२ वा दिवस
आध्यात्मिकता, शास्त्र, युध्द, राजकारण, काव्य, कला, साहित्य, संगीत आदी क्षेत्रात जगज्जेता ठरणाऱ्या वीरांना सगळे जग मानवंदना देते. थोर पुरुष म्हटले की इतिहासात हेच महान पुरुष डोळ्यापुढे उभे राहतात. मात्र यांच्या यशासाठी त्या काळात ज्यांनी थोडीही कुरकुर न करता कर्तव्यदक्षपणे रात्रंदिवस खूप काबाडकष्ट केले, मेहनत केली, अशा गरीब, अज्ञानी, उपेक्षित वर्गातील लोकांची दखल इतिहासात कुठेही घेतली जात नाही.
…स्वामी विवेकानंद
● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●
★ भारतीय सौर १५ वैशाख शके १९४६
★ चैत्र वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५०
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ रविवार दि. ५ मे २०२४
★ १८१८ साम्यवादाचे प्रणेते, जर्मन तत्वज्ञ कार्ल मार्क्स यांचा जन्मदिन.
★ १८२१ असामान्य सेनापती, कर्तबगार प्रशासक, जगज्जेता, फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट याचा स्मृतीदिन.
★ १९१६ भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा जन्मदिन.
★ १९१८ बालकवी तथा निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतीदिन
★ जागतिक व्यंगचित्रकार दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*