प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): शिक्षकांच्या समस्या वर्षानुवर्षाच्या असून त्या मांडल्या जातात. मात्र अनेक प्रश्न जैसे थे आहे. हे प्रश्न वेगाने सोडवण्यासाठी अँड. संदीप गुळवेंसारखा झोकून देऊन काम करणारा आमदार हवा आहे. विभागातील पाचही जिल्ह्यात महाराष्ट्रतील दोन नंबरची असलेली मविप्र शिक्षण संस्था व रयत शिक्षण संस्था तसेच संस्थाचालक, शिक्षक संघटना समर्थन देत असल्याने जिल्ह्यातील एकमेव प्रबळ उमेदवार असल्याने यावेळी गणित सोपे असून, निवडणूक जिंकणारच आणि पहिला आमदार या तालुक्याला मिळणारच. असा विश्वास माजी आमदार व संस्थाचालक शिवराम झोले यांनी यांनी व्यक्त केला.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करत असलेले येथील अँड संदीप गुळवे यांच्या समर्थनार्थ आज मंगळवारी रोजी गोंदे दुमाला येथील लक्ष्मी लॉन्सवर तालुक्यातील सर्व संस्थाचालक, मुख्यध्यापक व शिक्षक मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून माजी आमदार शिवराम झोले बोलत होते. तर व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर, शिक्षक मतदार संघाचे इच्छुक उमेदवार अँड. संदीप गुळवे, मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, उपसभापती विश्वास मोरे, सेवक संचालक एस. के. शिंदे, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष रविद्र मोरे, एनडीएसटीचे संचालक बाळासाहेब ढोबळे हे व्यासपिठावर उपस्थित होते. या मेळाव्यात तालुक्यातील सर्व संस्थाध्यक्ष व शिक्षक संघटनांनी अँड गुळवे यांच्या मागे उभे राहून तालुक्यातून सर्वच्या सर्व मते तर जिल्ह्यातूनही सर्वाधिक मते मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. संपर्क व प्रश्न सोडवण्याची तळमळ असली की लोक नक्कीच पाठबळ देतात हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनुभवले आहे. आताही पाच जिल्ह्यातून प्रमुख संस्थाध्यक्षानी साथ देण्याचे आश्वासन दिले असून, यामुळे येथे पहिला आमदार मिळण्याचे गणित जुळणार असल्याचा विश्वास अँड संदिप गुळवे यांनी व्यक्त केला. तसेच गुळवे म्हणाले की जुनी पेन्शन योजना, शिक्षकांना शाळाबाह्य कामे, आश्रमशाळेच्या वेळेत बदल, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांचे प्रश्न तर अनेक आहे ते हक्काने सोडवण्यासाठी उमदा, कार्यक्षम व कामाची चुणूक असलेला उमेदवार मिळाला आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पहिला आमदार लाभणार असल्याने तालुक्याची शान वाढवण्यासाठी अँड संदिप गुळवे यांच्यामागे संपूर्ण तालुका उभा राहील असे मत आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केले
शिक्षकांचे अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी दमदार शिक्षक प्रतिनिधी असावा अशी अपेक्षा व्यक्त करत आपला हक्काचा पहिला आमदार अँड संदीप गुळवे पाहिजे असा विश्वास माविप्रचे सेवक संचालक एस के शिंदे, माविप्र संचालक विश्वास मोरे, टिडीएफचे अध्यक्ष रविंद्र मोरे, रमेश गावीत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे निवृत्ती जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाणे, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, रमेश गावित, संचालक विश्वासराव मोरे, रविंद्र मोरे, प्राचार्य किरण रकीबे, जनता विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक तसेच विनायक लाड, घोटी बाजार समितीचे शिवाजी शिरसाठ, भरत आरोटे, संपत वाजे, समाधान वारूंगसे, अनुदानित वस्तीगृह संघटनेचे तानाजी भांगरे, संतोष भोर, साबळे सर, कल्पना सोनवणे, कमलाकर नाठे, जयराम धांडे, बी के जाधव, तानाजी भांगरे त्याच प्रमाणे इगतपुरी तालुक्यातील प्राचार्य व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्राचार्य पी. जे. देवरे यांनी केले तर आभार गुंजाळ सर यांनी मानले.