गुन्हे शाखेच्या युनिट नं.1 ची कामगिरी!
नाशिक (प्रतिनिधी): दामदुप्पट नव्हे, तर दामतिप्पट नोटा करून देतो, असे सांगून एका महिलेचे सात लाख रुपये घेऊन फरारी झालेल्या आरोपीस तब्बल दोन वर्षांनी अटक करण्यास गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाला यश आले आहे. तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (वय 25, रा. समर्थ हार्डवेअर दुकानासमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण, जि. नाशिक) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की सुमारे दोन वर्षांपूर्वी गेल्या वर्षी 11 मार्च 2022 रोजी ओळखीच्या महिलेला तिची रक्कम तिप्पट करून देतो, असे आमिष दाखवून तेजस वाघ याने एका महिलेला संगनमत करून फिर्यादी महिलेला हॉटेल चटक मटकसमोर, गंगाघाट येथे रात्री साडेनऊ वाजेच्या आसपास बोलावले होते. सात लाख रुपयांचे 23 लाख रुपये करून देतो, असे आमिष आरोपीने दाखविले होते. आमिषानुसार ही महिला घटनास्थळी आली असता तिच्याकडून सात लाख रुपये घेऊन त्याऐवजी बनावट नोटांची बंडले देऊन तेजस वाघ हा त्याच्याबरोबर असलेल्या महिला सहकाऱ्यासह फरारी झाला. या प्रकरणी दि. 12 मार्च 2022 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात भा.दं. वि. कलम 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
तेव्हापासून आरोपी सतत जागा बदलून लपून राहत होता.