सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५२८ वा दिवस
एखाद्या उदात्त आदर्शाभोवती एकत्रितपणे विचार करून आपले अपेक्षित ध्येय गाठण्याचे मार्ग निश्चित केले जातात. त्यासाठी आपली जेवढी शक्ती लावली जाईल त्या प्रमाणात आपणास यश निश्चित प्राप्त होईल. यात शंका नाही. ज्या देशातील सर्वसाधारण जनतेत शिक्षण, विद्या, समाजशक्ती, समानता, यांची जितकी वाढ होते, तितक्या प्रमाणात तो देश उन्नत व प्रगत होतो. सर्वसाधारण जनतेत विद्येचा प्रचार केला पाहिजे. शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. राष्ट्रनिर्मितीचा हाच एकमेव उपाय आहे.
*…स्वामी विवेकानंद*
*● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●*
*★ भारतीय सौर ११ वैशाख शके १९४६*
★ चैत्र वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५०
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ बुधवार दि. १ मे २०२४
★ १८९७ स्वामी विवेकानंद यांनी शैक्षणिक, धार्मिक व परमार्थिक अध्ययनासाठी “रामकृष्ण मठ/मिशनची” स्थापना केली.
★ जागतिक कामगार दिन…
★ १९६० महाराष्ट्र दिन….
“मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा” I
“प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा” II
II महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा II
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*