बुधवार, १ मे २०२४. चैत्र कृष्ण अष्टमी. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे” *काळाष्टमी, महाराष्ट्र दिन*
नक्षत्र – श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
आज दुपारी १२.५६ वाजता गुरु वृषभ राशीत प्रवेश करत आहेत.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामानिमित्त प्रवास घडतील. समजुतीच्या घोटाळा टाळा. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. बुधाचा चंद्राशी शुभ योग आहे. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. सरकारी कायदे मात्र कसोशीने पालन करा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) स्त्री धन वाढेल. एखादी अप्रिय बातमी येऊ शकते. वाहन जपून चालवा. कामानिमित्त भ्रमंती होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) परदेशात जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. आर्थिक आवक वाढेल. पत्नीची साथ लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. वाहन सौख लाभेल. जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल. उपासना लाभदायक ठरेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रिय व्यक्तीसोबत सहल घडेल. कनिष्ठांची साथ लाभेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. आवडत्या पाळीव प्राण्याचा सहवास लाभेल. शत्रू शिरजोर होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. व्यवहारिक लाभ होतील. गुंतवणूक योग्य ठरेल. अंदाज अचूक येतील. सूर्य उपसना करा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सावधपणे पावले टाकल्यास दिवस चांगला जाईल. घरगुती कामास वेळ द्याल. पाळीव पशूंचा लाभ मिळेल. सरकारी कामे रेंगाळतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. बुधाशी शुभ योग आहे. सामाजिक वजन वाढेल. लेखकांना उत्तम यश लाभेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रतिकूल दिवस आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. खर्च वाढतील. मान सन्मान मिळतील. वक्तृत्व चमकेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अत्यंत अनुकूल दिवस आहे. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. मन उत्साही राहील. सूर्य उपासना करा.
१ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, बुध आणि रवी या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी असावा असं तुम्हाला नेहमी वाटत असतं. तुमच्या कामात सातत्य असतं आणि तुम्ही कार्यक्षम आहात. तसे तुम्ही प्रेमळ आहात. मित्रांबद्दल तुम्हाला सहानुभूती आणि आदर असतो. तुम्ही कलासक्त असतात. सौंदर्याचे भोक्ते असतात. अनेकदा सुगंधी द्रव्ये वापरणे तुम्हाला आवडते. तुम्हाला प्रवासाची देखील आवड आहे. तुम्ही इतरांना चांगला सल्ला देऊ शकतात. उच्चप्रतीचे कपडे, दागिने, वाहन, घर तुम्ही वापरत असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला गणित, शास्त्र आणि व्यापार यांची आवड आहे. तुम्ही झटपट काम करतात. तुमचा कामाचा वेग जास्त असतो. एखादे काम हाती घेतल्यावर तुम्ही त्याचे पूर्वनियोजन उत्तम प्रकारे करतात. तुम्हाला गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे आहात. आळशीपणा तुम्हाला आवडत नाही. तुमची इच्छाशक्ती दांडगी असते. संशोधन करण्यात तुम्हाला रस असतो. तुमच्या बोलण्यात मोहक पणा आहे. लोकांना तुमचे बोलणे आवडते. तुम्ही तर्कशुद्ध विचार करतात आणि एखाद्या गोष्टीचा उत्तम विश्लेषण करू शकतात.
व्यवसाय:- तुम्ही एकाच व्यवसायात रमत नाहीत. व्यवसायात बदल करत असतात. पुस्तक विक्रेता, आयात-निर्यात, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरनेट, इंटरियर डेकोरेटर, डिपार्टमेंटल स्टोअर, केमिस्ट, इंजिनियर.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- सोनेरी.
शुभ रत्ने:- माणिक, पाचू, मोती.
– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*