आमित घरटे,
नाशिक (प्रतिनिधी): डिजीपी नगर नं. २, अंबड येथील मारूती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने हनुमान मुकुट व पालखी मिरवणूक, महाआरती करण्यात आली. मिरवणूकीत बजरंग बली आणि वानरांची वेषभूषा लक्षवेधी ठरली. यानंतर चिमुकल्यांनीही मल्लकाठी व दानपट्टा कलेचे सादरीकरण केले. उपस्थित भाविकांना त्यांना दाद देत कौतुक केले. सायंकाळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सालाबादप्रमाणे डिजीपी नगर नं.2, अंबड येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हनुमान मुर्तीला मुकुट बसविण्याचे ठरले. यावेळी सकाळी महाआरती करून परिसरात हनुमान मुर्तीमुकाटाची पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली होती. या मिरवणूकीत बजरंगबलीची वेषभूषा साकरलेला हनुमान व त्याच्या संगतीला दोन वानरे हे विशेष आकर्षण ठरले. मिरवणूत बजरंगबली बरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती. त्यानंतर शाळेतील चिमुकल्यांनीही मल्लकाठी व दानपट्टा कलेचे प्रदर्शन सादर केले. यावेळी उपस्थित शेकडो हनुमान भक्तांनी त्यांचे कौतूक केले. यानंतर सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डि.जी.पी.2 च्या मित्रमंडळाने परिश्रम घेतले तर जेष्ट नागरिकांनी सहकार्य केले.