नवीन नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील उंटवाडी येथे म्हसोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला असून रविवारी (दि. २१) कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त शनिवारी पहाटे पाच वाजता पंच कमेटीच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. सकाळी ९ वाजता महापुजन आणि तळी भरणे तर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळी १० वाजेपासून डॉ. चारुशिला नाईक यांसह टीमने सर्व रोग निदान शिबिरात रुग्ण तपासणी केली.
रविवारी दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमेटीचे अध्यक्ष फकिरराव तिडके, मधुकर तिडके, सदाशिव नाईक, अंबादास जगताप, रामचंद्र तिडके, आण्णा पाटील, दत्ता पाटील, बाजीराव तिडके, विलास जगताप, दिनकर तिडके, विष्णु जगताप, एकनाथ तिडके, जगन्नाथ तिडके, राजेश गाढवे, सुरेश जगताप, बाळासाहेब तिडके, संतोष कोठावळे, प्रवीण जगताप, दत्तात्रेय तिडके, अॅड संदीप फडतारे आदींनी केले आहे.