नाशिक (प्रतिनिधी): सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा वडागळी येथे दावल मलिक बाबांचा संदल आणि भव्य चादर मिरवणूकीचा कार्यक्रम अतिशय धूमधडक्यात साजरा झाला.
दरवर्षी एप्रिल महिन्यात हा उरूस साजरा केला जातो. वडागळी आणि परिसरातील सर्व जातीधर्माचे लोकं या संदल मध्ये सहभागी होतं असतात.संध्याकाळी 6 वाजता चादर ठेवलेल्या रथाची विधिवत पूजा करून मिरवणूकीला प्रारंभ केला जातो. या वर्षी सुद्धा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे, मा. आमदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. नगरसेवक गोकुळ नाना पिंगळे,शिवसेना संपर्क प्रमुख दत्ता नाना गायकवाड,मा. नगरसेवक मनोहर पाटील बोऱ्हाडे, मा. नगररसेवक अनिल भाई चौघुले,नाशिक म. न. पा. चे शिक्षण सभापती बाबुराव आढाव,जणलक्ष्मी बँकेचे संचालक रत्नाकर गायकवाड, शिवसेना जिल्हा उपप्रमुख देवानंदजी बिरारी,डॉ. झाकीरभाई शेख, भारत कोकाटे, इत्यादीच्या हस्ते विधिवत पूजा करून आणि श्रीफळ अर्पण करून मिरवणूकीला सुरवात करण्यात आली.
बीड जिल्ह्यातील मुखेड येथील गुरुकृपा ब्रास बँड आणि या वर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे नाशिक येथील नाशिक महिला ढोल पथक यांनी वडागळी करांचे मन जिंकून घेतले. सहा वाजता चालू झालेली मिरवणूक रात्री अकरा वाजता संपली.
फटाक्याच्या आतशबाजीत निघालेली मिरवणूकची शोभा खऱ्या अर्थाने नाशिक महिला ढोल पथका च्या ऊर्जापूर्वक वाजवण्याने आली. संदल मध्ये अडीच ते तीन हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.मुसलगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवलेला होता.या मिरवणूकीच खास वैशिस्ट म्हणजे संपूर्ण मिरवणूकित धर्मनिरपेक्षता जोपसण्यासाठी डॉ. झाकीर भाई यांच्या संकल्पनेतून सर्वाना भगव्या टोप्या आणि भगव्या झेंड्याचा वापर करून वडागळीतील हिंदू मुस्लिम आज पण बंधू भावा प्रमाणेच राहात असल्याचा पुरावा दिला गेला.
कार्यक्रमास रामदास आण्णा खुळे,नवनाथ मुरडनर, सुदेश खुळे, योगेश घोटेकर, अरुण भुसे, भागवत थोरात, सुनील मोरे, दिलीप पालवे, नितीन कर्पे, ज्ञानेश्वर बनकर, उमेश खुळे, बाळा खुळे, दाऊ खुळे, शशिकांत खुळे,राजू खुळे, विक्रम भास्कर खुळे, अशोक खुळे, राजू सुके, केशव भोकनळ, दत्ता भोकनळ, गिरीश आप्पा खुळे, मंगेश देसाई, विजूशेठ कुलथे, बापू कुलथे, प्रवीण कदम, कैलास आण्णा खुळे, दत्तू आण्णा खुळे,सलीम पठाण, इत्यादी सह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदल कमिटीचे विकास बकरे, सचिन कुलथे, संजय वाघमारे, रफिक शेख, सोनू पटेल, अल्लाउदीन शेख,मुन्ना शेख, शौकत मणियार, भैया मणियार, लियाकत मणियार पंकज कुलथे, लाला शेख, साजिद शेख, राजू पटेल, कुणाल खुळे, बब्बू शेख, गणेश कडवे, विष्णू थोरात, अनस शेख, यासिर शेख, इम्रान शेख, लखन शेख, पप्पू शेख, विक्रम खुळे,अन्सार शेख, फारूक शेख, वसीम शेख, रहेमान शेख, सुरेश कहांडळ, सुका अढागळे, अविनाश अढागळे, सुभाष रणदिवे, पपू बकरे, इत्यादी सह समस्त गावकारिणी विशेष परिश्रम घेतले.