पर्यायी मार्ग: काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडी मार्गे मेन रोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजाकडून इतरत्र मार्गस्थ होतील. काट्या मारुती, संतोष टी पॉइंट, द्वारका सर्कल, सारडा सर्कल मार्गे इतरत्र जातील.
नाशिक (प्रतिनिधी): सालाबादप्रमाणे यंदाही शुक्रवारी (दि.१९) श्रीराम व श्री गरूड रथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने काळाराम मंदिर परिसरासह मिरवणूक मार्गावर दुपारी २ ते मिरवणूक संपेपर्यंत सर्वच प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मिरवणूक मार्गावर प्रवेश बंद
श्रीराम रथ मिरवणूक श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून नाग चौक, चरण पादुका चौक, लक्ष्मण झुला पूल, काट्या मारुती, गणेशवाडी रोड, महात्मा फुले पुतळा, आयुर्वेदिक हॉस्पिटल, मरीमाता रोडने गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, कपालेश्वर मंदिर, रामकुंड, परशुराम पुरीया रोडने मालवीय चौक, शनि चौक, हनुमान चौक, आखाडा तालीम, काळाराम मंदिर उत्तर दरवाजा ते पूर्व दरवाजा या मार्गावरून काढण्यात येणार आहे, तसेच श्री गरूडरथ मिरवणूक रामरथा सोबत निघत असते. त्याचा मार्ग काळाराम मंदिर, नाग चौक, चरण पादुका रोडने, लक्ष्मण झुला पूल, जुना आडगाव नाका, काट्या मारुती चौकी, गणेशवाडी, महात्मा फुले पुतळा, आयुर्वेदिक हॉस्पिटल, मरीमाता रोडने गौरी पटांगण, रोकडोबा हनुमान मंदिर, गाडगे महाराज पुलाखालून दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉइंट, मेन रोडने बोहरपट्टी, सराफ बाजार, रामसेतू पुलाच्या पश्चिम बाजूने कपूर थळा मैदान, म्हसोबा पटांगण, रामरथाबरोबर येवून काळाराम मंदिर पूर्व दरवाजा या मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे.