शुक्रवार, १९ एप्रिल २०२४. वसंत ऋतू, क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वर्ज्य दिवस आहे. *कामदा एकादशी*
चंद्रनक्षत्र – मघा/पूर्वा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूलता वाढेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. प्रवास करतांना योग्य नियोजन करा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
घर आणि नोकरी यात ओढाताण होऊ शकते. नियोजन पूर्वक कामे करा. अनुकूल ‘मंगळ – गुरू’ योग सर्व इच्छा पूर्ण करेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. अनुकूल गुरू सर्व इच्छा पूर्ण करेल. भाग्योदय होईल. अति धाडस नको.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. शनीची नाराजी आहे. श्री. हनुमान उपासना तारून नेईल. बोलताना काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल गुरू सिद्धी प्राप्त करून देईन. कुदेवतेची कृपा राहील. भागीदारी व्यवसायात वितुष्ट येऊ शकते.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानात चंद्र आहे. कनिष्ठ सहकाऱ्याकडून त्रास संभवतो.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. दबदबा वाढेल. कार्यकुशलता वाढेल. अन्याय होऊ देऊ नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सौख्य लाभेल. कामाचा ताण वाढेल. आरोग्य सुधारेल. वास्तू संबंधित व्यवहार आज नकोत.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) राजकृपा होईल. उद्योग व्यवसायात वाढ होईल. शौर्य दाखवाल. भावंड मदत करतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अष्टम स्थानी चंद्र आहे. महत्वाची कामे आज नकोत. शब्द देताना काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विनाकारण शत्रुत्व घेऊ नका. खर्चात वाढ संभवते. त्यामुळे देणी असतील तर ती आज देऊन टाका.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील. मात्र खर्च वाढतील. आध्यत्मिक उन्नतीसाठी उत्तम कालावधी आहे.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)