आता नाशिक जिल्ह्यात गुटखा खरेदीदारही रडारवर; गुजरातचे गुटखा पुरवठादारांनाच ठोकल्या बेड्या!
नाशिक (प्रतिनिधी): का येतोय गुजरात मधुन गुठखा? कशाप्रकारे व कोणत्या कायद्याच्या आधारे चालताय गुटखा कंपणी राज्यात गुठखा विक्रीला बंदी असतानाही वाहतूक करण्यात यांना कोण देतंय आश्रय लवकरच खुलासा होणार असे चित्र नाशिक ग्रामीण पोलिस उघड करणार असे दिसतंय? वारंवर गुजरातमधून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची राजरोसपणे वाहतूक होत असल्याचे पोलीस कारवाईतून पुढे आले आहे. गुटख्याचे गुजरात कनेक्शन समोर आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी गुजरातच्या दोन गुटखा पुरवठादारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुटखा खरेदीदार पोलिसांच्या रडारवर आले असून, त्यांच्या अटकेनंतर या तस्करीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
किशोर गणेशाराम माळी (वय २१, रा. पहाडी रोड, नानापोंडा, जि. बलसाड) व उमेश वालाराम चौधरी (वय ३३, रा. सुतारपाडा, जि. बलसाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पेठ तालुक्यातील पिठुंदी नाका, तसेच दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाºया पिकअपसह इनोव्हा कार अडवून प्रतिबंधित गुटखा हस्तगत केला होता. या कारवाईत सुमारे १४ लाख रुपये किमतीचा साठा पोलिसांच्या हाती लागला होता. याप्रकरणी दोन्ही वाहनांच्या चालकांना बेड्या ठोकल्यानंतर पेठ व दिंडोरी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुठलेही बिल अथवा जीएसटीची पावती न देता गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी दोन्ही पुरवठादारांना हुडकून काढत बेड्या ठोकल्या असून, त्यांच्या अटकेने जिल्ह्यातील खरेदीदारांची माहिती उघड होणार आहे. एकूणच या तस्करीची साखळी समोर आल्याने पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. अधीक्षक विक्र म देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक नाना शिरोळे, अंमलदार किशोर खराटे, प्रवीण सानप, गिरीश बागूल, सुधाकर बागूल, उदय पाठक, शिवाजी ठोंबरे, विश्वनाथ काकड, सागर काकड, मेघराज जाधव, मनोज सानप, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, विनोद टिळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.