रविवार, १४ एप्रिल २०२४. चैत्रशुक्ल षष्ठी. वसंत ऋतू. क्रोधीनाम संवत्सर
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० वा. पर्यंत…
“आज चांगला दिवस आहे” डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घबाड सकाळी ११.४४ पर्यंत.
चंद्रनक्षत्र – आर्द्रा/पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीवर खर्च कराल. मेजवानीचे योग आहेत. दीर्घ कालीन परिणाम करणारे निर्णय घ्याल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल ग्रहमान आहे. वाहन सौख्य लाभेल. भेटवस्तू मिळतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. कामे मार्गी लागतील. प्रवास घडतील. जेष्ठांकडून लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. वेळेवर कामे पूर्ण होणार नाहीत. आळस वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. प्रगती होईल. स्वतासाठी खर्च कराल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामाचा ताण वाढेल. आर्थिक लाभ होतील. पत्नीशी मतभेद संभवतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मन प्रसन्न करणारा दिवस आहे. आर्थिक लाभ झाले तरी खर्च देखील वाढतील. प्रलोभने टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. दिवसाची सुरुवात संथ होणार आहे. घरगुती कामे पूर्ण होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. कुटुंबासोबत वेळ द्याल. यश मिळेल. सामाजिक कार्यात मतभेद संभवतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभ होतील. महिलांनी मौल्यवान दागिने संभळावेत. चोरीचे भय आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पंचम स्थानी चंद्र आहे. दीर्घकालीन नफ्याचे कामे होतील. घशाची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) एखादी छोटी सहल घडेल. मात्र वाहनांची काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)