नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले
प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्ग वर आज दुपारी ३:३० वा आठवा मैलाजवळ नासिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाड्यांचा एकमेकांना धडकुन झालेल्या अपघातात तीन जन गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
![मुंबई-आग्रा महामार्गावरील आठवा मैलांवर तिन गाड्यांच्या अपघात! 2 IMG 20240413 WA0009](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240413-WA0009.jpg?resize=640%2C853&ssl=1)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ईन्होवा क्रं MH.15. HG.6177 तसेच ओमीनी या गाडीचा नंबर मिळाला नाही तर तीसरी गाडी पसार झाली आहे. तीनही गाड्या एकमेकांवर आदळून भीषण झाला. त्यातील जखमी प्रविण भिकान रोजेकर वय ५२, हिरल प्रविण रोजेकर वय ४६ राहणार सिडको नाशिक तर किसन धोंगडे वय ७४, रुख्मिणी धोंगडे वय ४८ राहणार पाडळी देशमुख हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथिल जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिकेसह चालक निवृत्ती गुंड यांनी अपघातस्थळी पोहचुन व त्यातील जखमींना नासिक येथील सुयश हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.
![मुंबई-आग्रा महामार्गावरील आठवा मैलांवर तिन गाड्यांच्या अपघात! 3 IMG 20240413 WA0008](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240413-WA0008.jpg?resize=640%2C480&ssl=1)