नवी मुंबई : येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १७ वर्षाच्या गरोदर मुलीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. प्रेम प्रकरणामधून प्रेयसी गरोदर राहिली होती त्यांनतर तिने प्रियकराला लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दिला या घटनेमूळे मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही ५ महिन्याची गरोदर होती. गोवंडी येथे राहणाऱ्या एका मुलाशी या मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर प्रियकराने तिला लग्नाला नकार दिला. मुलगी गरोदर राहिल्याची माहिती कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी तिला विचारणा केली. त्यानंतर या मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी प्रियकराला अटक केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.