आज महाराष्ट्रताज्या बातम्या

आझाद समाज पार्टीचे “या” ठिकाणी चक्काजाम आंदोलन

Views: 91
0 0
Read Time:1 Minute, 56 Second

Loading

धुळे : शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्ड्याच्या मागील बाजू असलेले वाईन शॉप हटविण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी आज (दि. ४) आझाद समाज पार्टीच्यावतीने धुळ्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दरम्यान, धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागील बाजूस असलेले वाईन शॉप तेथून हटवण्यात यावे. त्याचबरोबर विटाई या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास परवानगी मिळावी. तसेच बाबासाहेबांच्या पुतळासाठी विटाई येथे शासनातर्फे देण्यात आलेल्या जागेजवळील सार्वजनिक मुतारीची जागा बदलण्यात यावी; या मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीच्यावतीने आज धुळ्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. आक्रमक झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून यावेळी आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *