मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. आता या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकनला पोलिसांनी अटक केली आहे.
केरळ पोलिसांनी अभिनेता विनायकनला अटक केली आहे. एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्याने दारुच्या नशेत राडा केला. दारूच्या नशेत विनायकन पोलिस ठाण्यात गेला होते. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांसोबत त्याने विनाकारण वाद घातला. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचण्यांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी त्याच्यावर गोंधळ घालणे आणि पोलिसांवर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता विनायकन यांना त्यांच्या सोसायटीत काही समस्यांचा सामना करावा लागत असल्याने चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना बोलावलं होतं.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रजनीकांत यांचा दमदार अभिनय आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला. रजनीकांतसह या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या विनायकननेही सिनेप्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. जेलर या सिनेमात त्याने वर्मन ही भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली. विनायकन हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.