मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे ४५ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या युवकाने आत्महत्या केली.
अधिक माहितीनुसार, आत्महत्या करणारा हा तरुण मुळाचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यामध्ये राजकीय वाद येण्याची शक्यता आहे.