[et_pb_section bb_built=”1″][et_pb_row _builder_version=”3.9″ custom_padding=”2%|2%|2%|2%” border_width_all=”1px” border_color_all=”#cccccc”][et_pb_column type=”4_4″][et_pb_text _builder_version=”3.9″]
प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक ही टाइम्स म्युझिकच्या ‘आपल्या लव्ह स्टोरीचा हिंदी पिक्चर’ या नव्या व्हीडिओ अल्बमद्वारे पुन्हा सर्वाचे मनोरंजन करण्यासाठी आली आहे. नव्या अल्बमबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा.
>> अल्बमद्वारे प्रेक्षकांपर्यंत लवकर पोहोचता येते..
प्रथमच मी टाइम्स म्युझिक कंपनीसोबत काम करतेय. लोकांना आवडेल असे गाणे त्यांना करायचे होते. ‘आपल्या लव्ह स्टोरीचा हिंदी पिक्चर’ हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला खूप आवडले. हे गाणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवे, असे मला वाटले. त्यामुळे मी काम करण्यास होकार दिला. माझे आजवरचे प्रत्येक गाणे लोकांपर्यंत सहज पोहोचले आहे. माझे गाणे अमूक एका वयोगटासाठी नसते. कुठल्याही वयोगटातील प्रेक्षक त्या गाण्याचा आनंद लुटू शकतो आणि लुटतात. यानिमित्ताने पुन्हा तसेच गाणे माझ्या वाटय़ाला आले. कुठल्याही माध्यमातून मी प्रेक्षकांच्या जवळ राहू इच्छिते. खणखणीत नाणे कुठेही चालते, अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. एखाद्या टीव्ही वाहिनीवरील गुणवत्ता शोध कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणून, एखाद्या नृत्यपर कार्यक्रमात सादर केलेला डान्स तसेच चित्रपट आणि मालिकेतील माझे काम प्रेक्षकांना आवडले आहे. अल्बमद्वारे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत लवकर पोहोचता. प्रेक्षकांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या नव्या प्रोजेक्टची त्यांना प्रतीक्षा असते. मायबाप प्रेक्षकांना ‘वेटिंग’वर ठेवायला मला आवडत नाही. सध्या प्रत्येक कामाचा आनंद लुटतेय.
[/et_pb_text][/et_pb_column][/et_pb_row][/et_pb_section]