शनिवार, ७ ऑक्टोबर २०२३. भाद्रपद कृष्ण अष्टमी. वर्षा ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”आज चांगला दिवस आहे” *अविधवा नवमी, नवमी श्राद्ध*नक्षत्र: पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मिथुन/कर्क. टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक लाभ होतील. मात्र सरकारी कामात दिरंगाई नको. काळजी पूर्वक वाटचाल करा. वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अति धाडस नको. आर्थिक नियोजन काळजी पूर्वक करा. संयम ठेवा. मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) काही चांगले अनुभव येतील. अभ्यासात लक्ष द्या. गैरसमज टाळा.कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अजूनही अनुकूलता नाही. नेहमीची कामे चालू ठेवा. नवीन काही सुरू करू नका. सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. नवीन मुहूर्तमेढ कराल. योग्य सल्ला घ्या. कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सावधपणे वाटचाल करा. आरोग्य सांभाळा. काही सुखद अनुभव येतील. तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल कालावधी आहे. जुनी येणी वसूल होतील. प्रवास घडतील. मात्र गैरसमज टाळा. वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संथपणे दिवस व्यतीत होईल. नियोजन बदलेल. संध्याकाळ आनंदाची. धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पूर्वार्धात कामे पूर्ण करा. आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या. संध्याकाळ विश्र्नातीची. मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सिद्धांत सोडू नका. चुकीची कामे नकोत. प्रशासकीय कामात लक्ष घालावे लागेल. कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक घडी बसेल. संध्याकाळ अनुकूल आहे. मात्र संततीची काळजी वाटेल. मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूलता वाढेल. कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. (कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) ७ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:- तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.व्यवसाय:- आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक.शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या**कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*