अखंडित, सातत्यपूर्ण संकल्पाचा २३१५ वा दिवस* तुम्ही पुरुषार्थी, आशावादी विचार लोकांना दिलेत तर ते विचार चट्कन आत्मसात करतील आणि खंबीरपणे उभे राहतील. भाषा असो की साहित्य असो, काव्य असो की कलेचे क्षेत्र असो, त्या क्षेत्रात लोकांच्या हातून चुका झाल्या तर लागलीच त्यावर बोट ठेवू नये. त्यामुळे माणसांचा तेजोभंग होतो. नैराश्य येते. माणसांच्या ठिकाणी जे चांगले आहे ते हळुवारपणे पुरविले पाहिजे. त्यांच्यातील दैवत्व रामकृष्णांनी जागे केले आणि त्यांच्या जीवनाची दिशा बदलून टाकली. त्यांच्या शिक्षणाची ही पध्दत अलौकिक होती. *स्वामी विवेकानंद…**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर ९ अश्विन शक १९४५*★ भाद्रपद वद्य /कृष्ण २★ शालिवाहन शके १९४५★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२५ ★ रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३ ★ पितृपक्ष, तृतीया श्राद्ध ★ १८३७ भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू. ★ १८४७ भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, ४५० ग्रंथाच्या लेखिका, थिऑसाॅफिस्ट, होमरुल लीगच्या संस्थापिका अॅनी बेझंट यांचा जन्मदिन.★ १९०६ जेष्ठ संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्मदिन★ १९१९ विख्यात मराठी लेखक, कवी, गीतकार, पटकथाकार, अभिनेते, गीतरामायणकार, महाराष्ट्राचे वाल्मिकी गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्मदिन.★ आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन.★ आंतरराष्ट्रीय संगीत दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*