नाशिक : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करुन खंडणी उकळणा-य चार जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या आरोपींकडून खंडणी स्वरूपात मागीतलेल्या रक्कमेपैकी १,३३,००,०००/- (एक कोटी तेहतीस लाख) रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली बोलेरो कॅप्मर गाडी, देशी बनावटीचा कटटा, सहा जिवंत राउंड असा ८,३२,५००/- रूपये असा एकूण १,४१,३२,५००/- रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. गुन्हे शाखा युनिट क्र. १ ने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.