. *–II ● विवेक विचार ● II–**
अखंडित, सातत्यपूर्ण संकल्पाचा २२९७ वा दिवस* शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या क्षमतांचे विकसन करणे होय, प्रेरणा निर्माण करणे; योग्य त्या दिशेने, कार्यक्षमतेने काम करता येईल, असे मनोबल व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण करणे म्हणजे शिक्षण होय, असे मला वाटते. अशा शिक्षणातून संघमित्रा, लीलावती, जिजाऊ, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई आणि मिराबाई यांची परंपरा चालविणाऱ्या “तेजस्विनी” निर्माण होऊ शकतात. *स्वामी विवेकानंद…**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर २२ भाद्रपद शक १९४५*★ निज श्रावण वद्य /कृष्ण १४★ शालिवाहन शके १९४५★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२५ ★ बुधवार दि. १३ सप्टेंबर २०२३ ★ १७९५ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी (तिथीनुसार)★ १९२९ लाहोर कटातील क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांचा स्मृतीदिन.★ १९३२ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्मदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*