. *–II ● विवेक विचार ● II–
**अखंडित, सातत्यपूर्ण संकल्पाचा २२७६ वा दिवस* जे काही प्रगतीत अडथळा निर्माण करते, वा जे काही अधःपतनाला सहाय्य करते तो अधर्म होय; आणि जे काही आपल्याला उन्नत होण्यास व आपल्या व्यक्तिमत्वाच्या विभन्न अंगांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यास साहाय्य करते तो धर्म होय. पावित्र्य, चित्तशुद्धी, दयादाक्षिण्य वगैरे गुणांचा ठेका जगातील कोणत्याही एका विशिष्ट धर्माने घेतलेला नाही. प्रत्येक धर्मात अति उदात्त चारित्र्याच्या नरणारींचा जन्म झालेला आहे. हा एवढा भरभक्कम पुरावा दृष्टीसमोर असूनही आपलाच तेवढा धर्म सर्वश्रेष्ठ असून तो चिरकाल टिकेल इतर धर्म कालांतराने नष्ट होतील, असे कोणी रचित असेल तर त्या अभाग्याची आपण कीवच केली पाहिजे. *स्वामी विवेकानंद…**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर १ भाद्रपद शक १९४५*★ निज श्रावण शुध्द /शुक्ल ७★ शालिवाहन शके १९४५★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२५ ★ बुधवार दि. २३ ऑगस्ट २०२३ ★ १९१८ प्रसिध्द मराठी लेखक, कवी, लघुनिबंधकार, टिकाकार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवीवर्य गोविंद विनायक तथा विं. दा. करंदीकर यांचा जन्मदिन.★ १९७४ मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा स्मृतीदिन★ आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन…
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*