रविवार, ६ ऑगस्ट २०२३. अधिक श्रावण कृष्ण पंचमी/षष्ठी. दक्षिणायन, वर्षा ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज कश्या तिथी “
चंद्र नक्षत्र – रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन:- कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नवीन ओळखी होतील. विक्री व्यवसायात वाढ होईल.
कर्क:- प्रतिष्ठा वाढेल. कीर्ती पसरेल. मात्र नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
सिंह:- घरात कुरबुरी होतील. क्रोध आवरा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहन सावकाश चालवा.
कन्या:- भलते धाडस नको. प्रवासात काळजी घ्या. अनुकूल रवी मान संन्मान बहाल करेल.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. नोकरीत सुखद अनुभव येतील.
वृश्चिक:- संतती कडे लक्ष द्यावे लागेल. प्रवासात काळजी घ्या. गुंतवणुकीतून नफा होऊ शकतो.
धनु:- छोटी खरेदी होईल. वाहन सुख लाभेल. मातेकडून लाभ होतील.
मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. शुभ घटना घडतील.
कुंभ:- आर्थिक आवक चांगली राहील. संध्याकाळ अनुकूल आहे. स्वजनाचा विरोध सहन करावा लागेल.
मीन:- बुद्धिमता आणि विद्या कामास येईल. गैरसमज टाळा. कौटुंबिक बाबतीत वेळ द्यावा लागेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)