तक्रारदार सुरेंद्र भास्करराव कोठावळे राहणार कलश बंगला प्लॉट नंबर 16 सर्वे नंबर 969 गायत्री नगर जुने सिडको जवळ नाशिक यांची फोन पे च्या माध्यमातून रक्कम एक लाख 80 हजार रुपये दिनांक 12/07/ 2023 रोजी फसवणूक झाली होती त्या अनुषंगाने तक्रारदार हे लागलीच दिनांक12/07/2023 रोजी सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली सदर तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कोरबू महिला पोलिस अंमलदार 941/जयश्री जाधव यांनी तात्काळ तांत्रिक विश्लेषण करून संबंधित कंपनीत ईमेल केले व सतत पाठपुरावा करून त्यांची गेलेली संपूर्ण रक्कम एक लाख 80 हजार दिनांक13/07/2023 रोजी तक्रारदार यांना परत मिळाली आहे याबाबत तक्रारदार यांनी समक्ष सायबर पोलीस ठाणे येथे येऊन सायबर पोलिसांचे आभार मानले.