. *–II ● विवेक विचार ● II
–**अखंडित, सातत्यपूर्ण संकल्पाचा २२३० वा दिवस* कोणत्याही व्यक्तीला वा राष्ट्राला थोर होण्यासाठी पुढील तीन गोष्टींची आवश्यकता आहे, पहिले चांगुलपणाच्या शक्तीवर प्रगाढ विश्वास, दोन मत्सराचा आणि संशयखोरपणाचा अभाव, आणि तिसरे जे चांगले बनण्याचा व चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या सर्वांना साहाय्य करणे. *स्वामी विवेकानंद…**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर १७ आषाढ शक १९४५*★ आषाढ वद्य /कृष्ण ६★ शालिवाहन शके १९४५★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२५ ★ शनिवार दि. ८ जुलै २०२३ ★ १७८९ मराठ्यांचा इतिहास लिहिणारा पहिला ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफ यांचा जन्मदिन.★ १९१६ साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्मदिन.★ २००८ महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभलेले आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा स्मृतीदिन. ★ अलर्जी प्रतिबंध दिन…
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*