शनिवार, १० जून २०२३. जेष्ठ कृष्ण सप्तमी. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० आज चांगला दिवस आहे. *कालाष्टमी*चंद्र नक्षत्र – शततारका. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ. मेष:- अनुकूल दिवस आहे. प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च कराल. उधार देणे टाळा. अनपेक्षित लाभ होतील. वृषभ:- नोकरी/ व्यवसायानिमित्त मेजवानी द्यावी लागेल. अपेक्षित यश मिळणार नाही. मित्रमंडळी भेटतील. मिथुन:- वारसा हक्काने लाभ होतील. जेष्ठ व्यक्तीसाठी खर्च करावा लागेल. प्रवासात काळजी घ्या. कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. विश्रांती घ्या. महत्वाची कामे आज नकोत. सरकारी कामातून त्रास जाणवेल. सिंह:- कामाच्या ठिकाणी विनाकारण त्रास जाणवेल. प्रतिष्ठा पणास लागेल. भाग्योदय होईल. कन्या:- फायद्याचे करार होतील. वेळ दवडू नका. मात्र काळजीपूर्वक निर्णय घ्या. तुळ:- आज फारशी अनुकूलता नाही. कामात अडथळे आले तरी खचून जाऊ नका. आरोग्य सांभाळा. वृश्चिक:- शेअर्स मधून लाभ होतील. लॉटरी लागू शकते. शेतीचे जुने वादविवाद संपवा.धनु:- आर्थिक आवक चांगली राहील. जुन्या गुंतवणुकीवर लाभ मिळतील. फायदा होऊ शकेल. चोरीचे भय आहे. मकर:- पूर्वीच्या वादातून त्रास संभवतो. आज शक्यतो महत्वाचे बोलणे नकोत. संयम बाळगा. संततीशी संवाद साधा. कुंभ:- छंद जोपासला जाईल. मेजवानी मिळेल. गृहकलह होऊ शकतो. शेजाऱ्यांचा त्रास जाणवेल. मीन:- संथपणे वाटचाल होईल. उदास विचारांचा सामना करावा लागेल. ध्यानधारणा लाभदायक ठरेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)