बुधवार, ७ जून २०२३. जेष्ठ कृष्ण चतुर्थी. ग्रीष्म ऋतू, शोभन नाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०आज शुभ दिवस आहे. *संकष्ट चतुर्थी* मुंबईचा चंद्रोदय रात्री १०.४३ वाजता. घबाड रात्री ९.०३ पर्यंत. चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर. मेष:- करार करताना काळजी घ्या. अनितीने वागू नका. गृहकलह होऊ शकतो. संध्याकाळ आनंदाची. वृषभ:- प्रवासात अडथळे येतील. उच्च शिक्षणात संभ्रम निर्माण होईल. वहन सावकाश चालवा. जलप्रवास घडेल. मिथुन:- अस्वस्थ करणारा दिवस आहे. काहीसा तणाव वाढेल. दगदग होईल. विश्र्नाती घ्या.कर्क:- कामे मार्गी लागतील. मात्र भागीदारीत वाद संभवतात. शत्रू त्रास जाणवेल. पत्नीशी मतभेद होतील. सिंह:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. उत्साह वाढेल. तीर्थाटन घडेल. विनाकारण खर्च होईल. कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. हुरहूर दाटेल. दानधर्म कराल. आवडत्या व्यक्तीसाठी खर्च होईल. तुळ:- पत्नीशी मतभेद संभवतात. शत्रू डोके वर काढतील. घरात शांतता राखा. नोकरीत प्रलोभने टाळा. वृश्चिक:- आर्थिक आवक वाढेल. मात्र अनितीने उत्पन्न नको. सरकारी कामातून त्रास जाणवेल. प्रवासात अडथळे.धनु:- खर्च वाढू शकतात. विनाकारण एखाद्या प्रकरणात मानसिक त्रास होऊ शकतो. संतती ची चिंता लागून राहील. मकर:- काहीसा तणावपूर्ण दिवस आहे. शेती आणि घराच्या संबंधित कामात अडथळे येतील. मात्र संध्याकाळ आनंदात व्यतीत कराल. कुंभ:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. गुरू सन्निध लाभेल. द्रव पदार्थापासून त्रास संभवतो. कौटूंबिक प्रश्न सुटतील. मीन:- अनुकूल दिवस आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. येणी वसूल होण्यास वेळ लागेल. प्रवासात धाडस नको.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)