बुधवार, ३ मे २०२३. वैशाख शुक्ल त्रयोदशी. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०”आज शुभ दिवस, *प्रदोष* घबाड रात्री ८.५६ नंतर.चंद्रनक्षत्र: हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक पाठबळ मिळेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. प्रतिष्ठा सांभाळा. भावंडांशी वाद नकोत. वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा वेग वाढेल. शुभ समाचार समजतील. वाहन जपून चालवा. कठोर बोलणे टाळा. मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गृहसौख्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. आप्त भेटतील. क्रोध आवरा.कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. उत्साही वाटेल. कायदेशीर कामासाठी खर्च होईल. सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिष्ठा साठी खर्च कराल. परदेश गमनात अडथळे येतील. पित्याची काळजी वाटेल.कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मेजवानी मिळेल. अनीती नको. भ्रष्टाचार टाळा. कामाच्या ठिकाणी कटकटी होऊ शकतात. तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पत्नीशी मतभेद संभवतात. भागीदारी व्यवसायात काळजी घ्या. नवीन करार नकोत. वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. नातेवाईक भेटतील. मनासारखी कामे होतील. नोकरांकडून त्रास संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्या.धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामचुकार पणा नको. गृहकलह होण्याची शक्यता आहे. पत्नीला विश्वासात घ्या. प्रतिष्ठा सांभाळा. मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तात्विक चर्चेत वेळ जाईल. गूढ वाढेल. घरात शांतता राखा. आरोग्य सांभाळा. कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या कृतीला समर्थन मिळणार नाही. विचारपूर्वक कार्य करा. संततीची काळजी घ्या. प्रवासात त्रास संभवतो. मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सोबतचे मित्र अडथळे निर्माण करतील. मत्सर त्रास जाणवेल. भिन्न लिंगी व्यक्तीकडून त्रास होईल