अश्विनी भालेराव, नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या ‘भौतिकशास्त्र’ विभागातील प्रा. उज्वला मनोहर पगार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली.
‘स्टडी ऑफ स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ मिक्स्ड बायनरी ऑक्साईड ऑफ निकेल ऑक्साईड-कोबाल्ट ऑक्साईड अँड निकेल ऑक्साईड-झिंक ऑक्साईड थिक फिल्म्स प्रिपेअरड बाय स्क्रीन प्रिंटिंग टेक्निक’ असा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. त्यांना लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. यु. पी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे एम. एस. जी कॉलेज मालेगाव कॅम्प, मालेगाव महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे देखील सहकार्य लाभले. त्यांचे एचपीटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे, उपप्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि आप्तेष्ट यांनी विशेष अभिनंदन केले.
![प्रा. उज्वला पगार यांना पीएचडी प्रदान 1 IMG 20230427 WA0002](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230427-WA0002.jpg?resize=640%2C806&ssl=1)